You are currently viewing मनसे व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला तर्फे 5 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन 

मनसे व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला तर्फे 5 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन 

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुका सचिव ह्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर गुरुवार दिनांक ५ मे २०२२ (वैशाख शुद्ध चतुर्थी शके २०७८) रोजी सकाळी ०९ ते १२.३० या वेळेत. आरवली सोन्सुरे शाळा येथे आयोजित करित आहोत. तरी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदात्यांनी ह्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन हे शिबीर यशस्वी करायचे आहे.
शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सदर रक्तदान शिबिर पार पाडावयाचे आहे.
या श्रेष्ठ समाजकार्यासाठी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना विनम्र आवाहन करीत आहोत. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बहुसंख्येने रक्तदान करुन आपण हा उपक्रम यशस्वी करुया.
तरी याप्रसंगी रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांनी
🩸 श्री आबा चिपकर (मनसे तालुका सचिव }
*+91 75077 68407*
🩸 श्री भूषण मांजरेकर (सिंधुरक्तमित्र तालुका सह खजिनदार)
+91 85509 36440,
🩸 श्री महेश राऊळ (सिंधुरक्तमित्र जिल्हा उपाध्यक्ष) 9405933912 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

रक्तदात्यांसाठी सूचना

१)सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, कफ, श्वास घेण्यास त्रास होणार्‍या व्यक्तींनी येऊ नये, ही विनंती.

२) वयोगट- १८ वर्षे ते ५५ वर्षे व वजन- ५० किग्रॅ पेक्षा जास्त असावे.

३) रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण झोप झालेली असावी. (जागरण नसावे)

४) कोणत्याही प्रकारची }औषधे घेतलेली नसावीत.(अँस्प्रिन,पॅरासिटॅमल व इतर)

५)रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी जेवण करून विश्रांती घ्यावी व सकाळी येताना भरपेट नाष्टा करुन यावे

६)कोविड लस घेतली असेल तर ती घेऊन रक्तदान दिवशी पंधरा दिवस झालेले असावेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =