You are currently viewing तलाठी भरती पूर्वतयारी शिबिराचे उद्या कुडाळ येथे नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

तलाठी भरती पूर्वतयारी शिबिराचे उद्या कुडाळ येथे नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

*तलाठी भरती पूर्वतयारी शिबिराचे उद्या कुडाळ येथे नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते होणार उदघाटन*

*आमदार वैभव नाईक, अमित सामंत, अभय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती*

आमदार वैभवजी नाईक यांच्या पुढाकारातून तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर आयोजित तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारी शिबिराचे उदघाटन उद्या शनिवार दि १५/०७/२०२३ रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे सकाळी ठीक १०.३० वाजता कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास आमदार मा वैभवजी नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी जान्हवी सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, रुपेश पावसकर, अतुल बंगे, उप नगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, नगरसेवक श्रेया गवंडे, ज्योती जळवी, सई काळप, श्रुती वर्दम, आफ्रिन करोल, उदय मांजरेकर, किरण शिंदे, हे उपस्थित राहणार आहेत.
तरी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तलाठी भरती साठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजन नाईक, संघटक श्री बबन बोभाटे, शहरप्रमुख श्री संतोष शिरसाट व आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा