You are currently viewing भुईबावडा गावचे सुपुत्र प्रकाश नारकर यांना ‘राज्यस्तरीय बेस्ट टीचर’ अवार्ड प्रदान

भुईबावडा गावचे सुपुत्र प्रकाश नारकर यांना ‘राज्यस्तरीय बेस्ट टीचर’ अवार्ड प्रदान

भुईबावडा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

वैभववाडी

शिक्षक हे नुसते विद्यार्थी घडविण्याचे काम करीत नाहीत तर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करुन एक चांगला नागरिक व माणूस घडविण्याचे मोलाचे काम करीत असतात. भुईबावडा गावचे सुपुत्र प्रकाश नारकर यांनी आदिवासी भागात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिरडे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रीडा आदी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याने त्यांना अविष्कार फाऊंडेशन पुरस्कृत २०२० चा ‘राज्यस्तरीय बेस्ट टीचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गोव्याचे माजी केंद्रीय कायदामंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप तसेच अविष्कार फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, दक्षिण विभागीय अध्यक्षा श्रीमती उज्वला सातपुते यांच्या हस्ते नुकताच मडगाव गोवा येथे मानपत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


शिक्षक प्रकाश नारकर हे मुंबई येथील एच. डी. एफ. सी. बँकेतील नोकरी सोडून आठ वर्ष आदिवासी भागात शैक्षणिक सामाजिक कार्य करीत आहेत त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक समूह प्रशासक तसेच सर फाउंडेशन राजूर प्रकल्प समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच आदिवासी विभागातील सर्व अधिकारी शिक्षक कर्मचारी यांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 6 =