You are currently viewing रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

*रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी*
*अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर*
*वेतये सरपंच गुणाजी गावडे*

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच आपण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे, वेतये सरपंच गुणाजी गावडे यांनी स्पष्ट केले. येत्या काळात तालुक्यातील इतर पदाधिकारीही प्रवेश करतील, असेही ते म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वेतये सरपंच गुणाजी गावडे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्यानंतर मिडियाशी त्यांनी संवाद साधला.
प्रतिक्रिया देताना, तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीला आणि कार्यकर्त्यांचे खाच्चिकरण करण्याच्या वृत्तीमुळे नाराजी आहे, त्यामूळे येत्या काळात अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा मार्गावर आहेत असेही सुतवाच गुणाजी गावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + one =