You are currently viewing जय महादबा एक्सपोर्ट कंपनीचा कापडी पिशवी कंटेनर अमेरिकेला रवाना

जय महादबा एक्सपोर्ट कंपनीचा कापडी पिशवी कंटेनर अमेरिकेला रवाना

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा अध्यात्मिक गुरु
बाळ महाराज उर्फ संतोष कोळी
यांच्या
जय महादबा एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून
यंत्रमागावरील कापडापासून तयार केलेल्या चांगल्या प्रतीच्या पिशव्यांचा एक कंटेनर अमेरिका देशासाठी रवाना करण्यात आला.
या एक्सपोर्टचा शुभारंभ
सदगुरु शामराव बत्ते महाराज यांच्या हस्ते कंटेनरचे विधीवत पूजन करुन करण्यात आले.
यानिमित्ताने बाळ महाराज यांच्या धाडसी प्रयत्नाला यश आले असून आता
वस्त्रनगरीचे
नांव सातासमुद्रापार पोहचून वस्त्रोद्योगाच्या
लौकिकाला नव्यानं झळाळी मिळाली आहे.

इचलकरंजी शहरातील अध्यात्मिक क्षेत्रातील
गुरु प्रसिद्ध किर्तनदार बाळ महाराज उर्फ संतोष कोळी यांनी आपल्या जय महादबा एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाशी निगडीत
उद्योग – व्यवसायात उतरुन चांगले यश संपादन करत समाजाला उद्योमशिलतेचा संदेश दिला आहे.सध्या प्लास्टिक वापराच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून त्याचे दूरगामी घातक परिणाम समाजावर होत आहे. त्यामुळे भारताबरोबरच बाहेरच्या देशातही प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात येत असून याला चांगला पर्याय म्हणून आता कापडी पिशव्यांच्या वापराला अधिक पसंती दिली जात आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध उद्योजक अध्यात्मिक गुरु
बाळ महाराज उर्फ संतोष कोळी
यांनी जगभरातील पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांची मागणी व गरज ओळखून त्या उद्देशाने
जय महादबा एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून
कापडी पिशव्या निर्मितीसाठी
प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून यंत्रमागावरील कापडापासून चांगल्या प्रतीच्या पिशव्यांची निर्मिती केली आहे.उत्पादित केलेल्या या कापडी पिशव्यांचा एक कंटेनर नुकताच अमेरिका देशासाठी रवाना करण्यात आला.
भविष्यात मागणीनुसार कापडी पिशव्यांची निर्मिती करुन त्याचे अमेरिका देशाबरोबरच अन्य देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच आधीच चायनाच्या वस्तूंना कंटाळलेल्या नागरिकांना चांगला किफायतशीर पर्याय निर्माण होईल ,असा विश्वास जय महादबा एक्सपोर्ट कंपनीचे बाळ महाराज ऊर्फ संतोष कोळी
यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी ,अमेरिका देशासाठी एक्सपोर्ट होत असलेल्या कंटेनरचे सद्गुरु
शामराव बत्ते महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.यावेळी बाळ महाराज
तथा संतोष कोळी
,राजन उरुणकर ,
सखाराम आठवले ,आनंद माधव ,
मुकूंद प्रभूदेसाई ,
सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर ,सुनील निवळे ,दत्ता पाटील ,प्रकाश मोरबाळे ,अशोक कांबळे ,सुनील फाटक
यांच्यासह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =