You are currently viewing कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या 60 रिक्त जागांवर पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यात 7 ग्रामपंचायत मध्ये 11 जागांकरिता पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत.

या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 13 ते 20 मे पर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून, 23 मे रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 25 मे पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याकरिता अंतिम मुदत असणार आहे. तर 5 जून रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. 6 जून रोजी मतमोजणी घेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात चिंचवली 1, ओझरम 3, नांदगाव 1, वायगणी 1, बेळणे खुर्द 2, नडगिवे 1, साळिस्ते 2 या ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला व अनुसूचित जाती या प्रवर्गातील रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहेत. 5 मे रोजी तहसीलदार कणकवली यांच्याकडून याबाबतची निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =