You are currently viewing अभिनेते शरद पोंक्षे यांना एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार

अभिनेते शरद पोंक्षे यांना एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार

वेंगुर्ले :

२०१७ सालापासून सुरू झालेला स्वर्गीय एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार यावर्षी सुविख्यात अभिनेते उत्तम वक्ते, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांना ११ जून रोजी येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

शनिवारी ११ जून रोजी दुपारी तीन वाजता येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात शरद पोंक्षे हे ‘समाजसुधारक सावरकर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत उपस्थित राहावे असे आवाहन एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार समितीचे डॉक्टर अमेय देसाई व वेंगुर्ले येथील कार्यक्रमांचे संयोजक प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =