You are currently viewing मालवणात शिवसेनेच्यावतीने पारंपारिक शिवजयंती साजरी

मालवणात शिवसेनेच्यावतीने पारंपारिक शिवजयंती साजरी

मालवण

जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… असा जयघोष करत… ढोल ताशांचा गजरात, भगव्या पताका फडकवित आज मालवणात शिवसेनेकडून भव्य मिरवणूक काढत वैशाख वद्य द्वितीया तिथीनुसार पारंपारिक पद्धतीने होणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या मिरवणुकीस आम. वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली. यानिमित्त मालवण शिवसेना शाखा कार्यालय येथे सत्यनारायण महापूजाही संपन्न झाली. मालवण तालुका शिवसेना शाखा कार्यालय येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीही वैशाख वद्य द्वितीया तिथीं नुसार पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

यानिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बहुसंख्य नागरिकांनी तिर्थप्रासादाचा लाभ घेतला. तर सायंकाळी शिवसेनेतर्फे मालवण शहरातून महिला ढोल पथकाच्या साथीने वाजत गाजत व शिवरायांचा जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात भगवे फेटे परिधान करत व भगव्या पताका फडकवत शिवसेना पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची पात्र असलेला देखावा साकारण्यात आला होता.

या मिरवणुकीत आम. वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, संमेश परब, अमित भोगले , बंडू चव्हाण, मसुरे सरपंच संदीप हडकर, पोलीस पाटील भोगावकर, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, बाळू नाटेकर, महेंद्र म्हाडगुत, महेश मांजरेकर, आतु फर्नांडिस, प्रसाद आडवणकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, शिला गिरकर, नंदा सारंग, अंजना सामंत, सौ. श्वेता सावंत, सौ. शिल्पा खोत आदी व इतर सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा