You are currently viewing बबलू गवस यांच्यातर्फे मडूऱ्यातील नारायण तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

बबलू गवस यांच्यातर्फे मडूऱ्यातील नारायण तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

बबलू गवस यांच्यातर्फे मडूऱ्यातील नारायण तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

बांदा

सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मात्र वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव उर्फ बबलू गवस यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांची पत्नी सौ. प्रणाली व मुलगा विराज यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता त्या रकमेतून मडुरा रेडकरवाडी येथील तीन वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या नारायण तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू व खाऊ वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मडुरा रेडकरवाडी येथील नारायण तोरसकर हे गेली तीन वर्षे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांची पत्नी मुकी व बहिरी असून पती आजारी असल्याने त्या मोलमजुरीच्या कामाला जाऊ शकत नाहीत. साहजिकच त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबतची माहिती बबलू गवस यांना मिळताच त्यांनी आपली पत्नी व मुलग्याचा वाढदिवस साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी सदर रकमेतून तोरसकर कुटुंबियांकडे जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी व मुलानेही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
बबलू गवस यांनी मडुरा येथे जाऊन तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या. यावेळी पत्रकार विराज परब, शैलेश गवस, विश्वनाथ नाईक, यशवंत माधव, राकेश परब, प्रवीण परब आदी उपस्थित होते. तोरसकर कुटुंबियांकडून बबलू गवस यांचे आभार मानण्यात आले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा