You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

पूर्णाकृती पुतळ्याचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमीपूजन

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात नगरपरिषदे मार्फत बसवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आज भोसले उद्यान येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत पार पडला. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा व्हावा ही समस्त सावंतवाडी करांची इच्छा होती. ही इच्छा आज नगराध्यक्ष संजू परब यांनी पूर्ण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून, आज त्या जागेचे भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. . येत्या काही महिन्यातच या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयवंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, संदेश टेमकर, बांदा सरपंच अक्रम खान, मकरंद तोरसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा