You are currently viewing एस टी एस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील अथर्व सावंत आणि कु.वैदेही राणेंचे अभिनंदन यश….

एस टी एस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील अथर्व सावंत आणि कु.वैदेही राणेंचे अभिनंदन यश….

तळेरे:- प्रतिनिधी

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित “सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एस.टी एस) परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.६वी मधील कु.अथर्व सत्यविजय सावंत याने 156 गुणासह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सहावा येण्याचा मान पटकावला असून याच विद्यालयातील सातवी मधील विद्यार्थिनी कु. वैदेही मधुसूदन राणे हिने 132 गुणासह कणकवली तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून इयत्ता सहावी,सातवी व आठवी मधुन प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी उत्तम गुणासह उत्तीर्ण झाले आहेत.
या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक यशवंत परब, कु.प्रियंका सुतार, सौ.शरयू पाताडे व पालकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उज्ज्वल यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटी व स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य एम.डी. खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

१)अर्थव सावंत
२)वैदेही राणे

प्रतिक्रिया व्यक्त करा