You are currently viewing नाटळ मल्हार नदीवरील पूल जनतेसाठी झाला खुला

नाटळ मल्हार नदीवरील पूल जनतेसाठी झाला खुला

खास. विनायक राऊत, आम.वैभव नाईक, सतीश सावंत यांच्यासह शिवसेना नेत्यांची उपस्थिती

कणकवली

कणकवली नाटळ मार्गावर मल्हार नदीवरील जुना पूल काही महिन्यांपूर्वी कोसळल्यानंतर याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. व यानंतर गणेशोत्सवापूर्वी मल्हार नदीवरील नवीन पूल वाहतुकीस सुरू झाला. त्याचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक व शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी या पुलाच्या कामाकरिता तातडीने निधी मंजूर केला होता. त्यानंतर ठेकेदारामार्फत हे काम गणेश चतुर्थीपूर्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. त्याला यश आले आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मल्हार नदीवरील या नवीन पर्यायी पुलाचे लोकार्पण करून या दशक्रोशीतील नागरिकांना गेले काही महिने बंद असलेला रहदारीचा मार्ग अखेर सुरू झाला आहे.

या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना विधानसभा संघटक सचिन सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, रीमेश चव्हाण, ऍड. हर्षद गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व नाटळ कनेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ हेमंत सावंत, मंगेश सावंत, बेनी डिसोझा, मिथिल दळवी, रिमेश चव्हाण, आनंद आचरेकर, दाजी गावकर  उपस्थित होते. अल्पावधीत या पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी समाधान व्यक्त करत जनतेसाठी सदैव शिवसेना तत्पर असल्याचे दाखवून दिल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + sixteen =