You are currently viewing बांदा केंद्रशाळेत बासरी वादन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

बांदा केंद्रशाळेत बासरी वादन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

बांदा

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या संकल्पनेतून एक दिवशीय प्रभागस्तरीय भारतीय संगीत वाद्यातील आद्य वाद्य असलेल्या बासरी वादनाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता.
सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचे कला शिक्षक स्वप्निल गोरे यांनी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले .या वासरी वादन कार्यशाळेला ३९ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना बासरीचा इतिहास,बासरीची रचना व वादन करणे याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक स्वप्निल गोरे यांचा बांदा सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंदप्रमुख संदीप गवस,लक्ष्मीकांत ठाकूर,श्रदधा महाले ,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रविंद्र गवस मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर , ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्रम खान यांनी पारंपारिक वाद्य असणारे बासरी या प्रशिक्षण वर्गाचे कौतुक करुन प्रत्येकाने किमान एक तरी छंद जोपासून त्यात नावलौकीक मिळवावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दर्वा साळगांवकर यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा