You are currently viewing कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्रशांत सावंत ‘आदर्श सेवक’ पुरस्काराने सन्मानित
कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्रशांत सावंत मान्यवरांच्या हस्ते 'जिल्हा आदर्श सेवक' पुरस्काराने सन्मानित होताना...

कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्रशांत सावंत ‘आदर्श सेवक’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे :- प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रशांत प्रकाश सावंत यांना यावर्षीचा ‘आदर्श सेवक पुरस्कार २०२२’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गनगरी येथे संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात प्रशांत सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते शाल,रोपटे, गौरवपत्र प्रदान करुन संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, बी.डी. पाटील, सागर पाटील, टी.के. पाटील, संघटनेचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जि.पचे माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर,महिला आघाडी प्रमुख अश्विनी गर्जे, जिल्हा सचिव पांडुरंग काळे,श्री. शिंदे व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत सावंत यांच्या या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, तसेच स्थानिक व्यवस्था समिती व स्कुल कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि प्राचार्य एम.डी. खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्रशांत सावंत मान्यवरांच्या हस्ते ‘जिल्हा आदर्श सेवक’ पुरस्काराने सन्मानित होताना…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा