You are currently viewing १ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

१ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

*१ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐*

आदर्श महाराष्ट्राचा आम्हां अभिमान
देवतांची संताची पुण्यभूमी खाण।।धृ।।

आदर्श श्री शिवाजी राजे राष्ट्रभूषण
राज्यकर्ते शाहू राजे पेशवे सुजाण
नांदत आहे प्रजा गुण्या गोविंदानं ।।१।।

पर्वत किल्ले गड करिती रक्षण
क्रांतिकारी शूरवीरांनी वेचले प्राण
आहे भारत घडविण्यात योगदान।।२।।
वाव
सागर नद्या कालवे भूमी संपन्न
वैभव कृषिवल कष्टकरी गुणवान
परंपरा थोर आहे उद्योजक शास्त्रज्ञ।।३।।

सर्व धर्म समभावे येथे नांदती जन
कवी लेखक कला संस्कृती आंदण
आहे मराठी भाषा मायबोली शान ।।४।।

काव्य:-श्री अरुण गांगल.कर्जत,रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 13 =