You are currently viewing “महाराणा प्रताप नरेश जयंती निमित्त अभिवादन!”

“महाराणा प्रताप नरेश जयंती निमित्त अभिवादन!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”महाराणा प्रताप नरेश जयंती निमित्त अभिवादन!”* 

 

महाराणा प्रताप शूरवीर राजपूत

देश प्रेमाची पराक्रमी तेवती ज्योतIIधृII

 

मेवाड सूर्यवंश जन्मले राजघराण्यांत

माता जयवंताबाई पिता उदय सिंह होत

वावरायाचे नरेश सदा जनसामान्यांतII1II

 

सुपुत्र राणांची देह यष्टी राहे बलदंड

दांडपट्टा घोडे स्वारी युद्ध शास्त्र निपूण

वाढले भिल्ल सवंगड्याचे सहवासांतII2II

 

दोन अवजड तलवारी भाला राहे बाळगून

थरकाप उडे शत्रूला त्यांची होती दहशत

चेतक अश्वानं त्यांना दिली सर्वथा साथII3II

 

मोजक्या सैन्यासह लढले प्राणप्रणानं

ऐतिहासिक लढाई झाली हळदी घाटीत

राज्य स्थापिले दिवेरची लढाई जिंकूनII4II

 

अतुलनीय साहसे लढले मर्दपणानं

स्वातंत्र्य प्रेमासाठी अर्पिले निस्वार्थ जीवन

प्रेरणादायी आदर्श वीरांना करू वंदन II5II

 

श्री अरुण गांगल, कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा