You are currently viewing वागदे गावात साईबाबा स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली जुगार

वागदे गावात साईबाबा स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली जुगार

*जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन*

 

कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वागदे गावात “साईबाबा स्पोर्ट्स बक्लब” नावाने एक क्लब सुरू आहे. या क्लबमध्ये राजरोसपणे जुगार सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी या क्लबमध्ये सौदेबाजी वरून जिल्ह्यातील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. मालवण आणि कणकवली मधील जुगारी लोक यावेळी एकमेकाला भिडले असल्याचे माध्यमातील बातम्यांमध्ये आलेले आहे.

 

सदर क्लब हा बंद करण्यात यावा याकरिता वागदे गावातील ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला, उपोषणे केली मात्र यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या क्लबला आपल्या पोलीस खात्याचा वरदहस्त असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. या क्लबमुळे वागदे गावातील आणि कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडत आहे. किंबहुना ही तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जाऊ शकते. यासोबतच या क्लब मुळे सातत्याने वागदे गावाचे नाव बदनाम होत आहे.

 

तरी या क्लब वर कारवाई करून हा क्लब वागदे गावांमधून हटविण्यात यावा अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी करत आहोत. हा क्लब वागदे गावातून हद्दपार झाला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आपल्या कणकवली पोलिस ठाण्यासमोर येत्या पंधरा दिवसात उपोषण करू असा इशारा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँगेस अध्यक्ष नयन गावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eleven =