You are currently viewing लीलावीश फाऊंडेशमार्फत कासार्डे माध्य.विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाख रु. शिष्यवृत्तीचे वितरण

लीलावीश फाऊंडेशमार्फत कासार्डे माध्य.विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाख रु. शिष्यवृत्तीचे वितरण

तळेरे :- प्रतिनिधी

लीलाविश फाउंडेशनच्यावतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी २५०००० रु शिष्यवृत्तीचे वितरण संस्थेचे पदाधिकारी, लीलाविशचे प्रतिनिधी आणि प्रार्चाय, पर्यवेक्षक आणि शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती धनादेश वितरण सोहळ्याला व्यासपीठावर विकास मंडळाचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य मधुकर खाडये, लीलाविश फौउडेंशनचे प्रतिनिधी बबन‌ नारकर, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लीलाविश फाउंडेशनचे संचालक महेश विश्राम नारकर, राजेश विश्राम नारकर यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भागविण्यासाठी कासार्डे माध्यमिक विद्यालयाची निवड केली आहे. लीलाविश फांऊडेशनच्या माध्यमातून कासार्डे विद्यालयातील इ.५वी ते इ. १२ वी मधील ५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये प्रमाणे २५००००लाख रु शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, अध्यक्ष परशुराम माईणकर, प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी मनोगत व्यक्त करताना, सामाजिक बांधिलकी म्हणून नारकर बंधुनी लिलावीश फाऊंडेशनच्या माध्यमातून शिष्यवृत्ती सुरू करुन गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा आधार दिला आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी ही शिष्यवृत्ती शैक्षणिक कामासाठी सत्ककारणी लावावी आणि शैक्षणिक प्रगतीची यशस्वी वाटचाल अशीच सुरु ठेवावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.याप्रसंगी लीलाविशचे प्रतिनिधी बबन नारकर म्हणाले की, गरीबीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडथळा निर्माण होवू नये म्हणून पियाळीतील नारकर बंधुनी ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली असुन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी निश्चित याचा फायदा घेत आपली शैक्षणिक प्रगती करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

*कासार्डे विद्यालयात आतापर्यंत ६.५ लाख शिष्यवृत्तीचे वाटप*

तीन वर्षात आत्तापर्यंत लीलावीश फाऊंडेशनच्या माध्यमातून कासार्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ६लाख ५०हजाराची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्यावतीने कु.प्रेरणा गाडे हिने मनोगत व्यक्त करताना लीलाविश फाउंडेशनचे विशेष आभार मानले. याप्रसंगी एस.व्ही .राणे,सौ.बी.बी.
बिसुरे यांनी ही मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र राऊळ यांनी केले. आभार पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनी मानले.
या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याला विद्यार्थ्यी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील लीलावीश फाऊंडेशनचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व त्यांचे पालक सोबत संस्था पदाधिकारी व प्राचार्य, पर्यवेक्षक

प्रतिक्रिया व्यक्त करा