You are currently viewing वेंगुर्ले येथील हरिचरणगिरी किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा सापडला मृतदेह 

वेंगुर्ले येथील हरिचरणगिरी किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा सापडला मृतदेह 

वेंगुर्ले येथील हरिचरणगिरी किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा सापडला मृतदेह

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर आज गुरूवार ९ मे रोजी सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाच्या अंगावर केवळ हाफ पॅन्ट आहे. दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

आज सकाळी समुद्रातून पाण्याबरोबर वाहत येऊन हरिचरणगिरी येथील किनाऱ्यावर लागलेल्या या मृतदेहाबाबत वेंगुर्ले पोलिसांना कळविण्यात आले असून वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आपल्या परिसरामध्ये कुणी व्यक्ती बेपत्ता असल्यास त्याची माहिती वेंगुर्ले पोलीस स्टेशनची संपर्क करून द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा