You are currently viewing गेल्या २५ वर्षांची मागणी आ.वैभव नाईक यांनी केली पूर्ण

गेल्या २५ वर्षांची मागणी आ.वैभव नाईक यांनी केली पूर्ण

*आंबेरी पुलाचे खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते सोमवारी भूमीपूजन*

 

*आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर*

 

गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या माणगाव खोऱ्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या आंबेरी पुलासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत. सोमवार ०२ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा आंबेरी पुलाच्या ठिकाणी होणार आहे. तरी याप्रसंगी माणगाव खोऱ्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.

 

आंबेरी पुलामुळे माणगाव खोऱ्यातील अनेक गाव एकमेकांना जोडले जात आहेत. येथे ४० वर्षापूर्वी बांधलेला जुना पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते. पावसाळयात सलग दोन ते तीन दिवस पुल पाण्याखाली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. गेली २५ वर्षे याठिकाणी मोठा पूल बांधण्याची मागणी होत होती. त्यासाठी माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, राजू कविटकर, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, घावनळे विभाग प्रमुख रामा धुरी, माजी पं. स.सदस्य श्रेया परब, माजी जि.प.सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, सुधीर राऊळ, सागर म्हाडगुत यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आ. दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून राज्याच्या बजेट अंतर्गत आंबेरी पुलासाठी ६ कोटी २५ लाख रु मंजूर करून घेतले आहेत. मोठा पूल मंजूर झाल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा