You are currently viewing कणकवली शहराची विकासाकडे वाटचाल….!

कणकवली शहराची विकासाकडे वाटचाल….!

कणकवली

कणकवली शहराची विकासाकडे वाटचाल सुरू असून, कणकवली शहरातील नागरिकांना रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी जाण्या येण्यासाठीचा रस्ता उपलब्ध असतो. त्या गावाचा शहराचा परिणामी त्या भागाचा विकास निश्चितच होतो असे म्हटले जाते. त्याच अनुषंगाने कणकवली नगरपंचायतने सध्या शहरात विविध भागांमधील अंतर्गत रस्ते करण्याचा धडाका सुरू केल्याने कणकवलीचा शाश्वत विकास सध्या नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून नवनवीन रस्ते विकसित केले जात आहेत.

नवीन रस्ते विकासाचा धडाका सुरू असताना कणकवली टेबवाडी मधील रहिवाशांच्या दृष्टीने एक अजून महत्त्वाचा रस्ता कार्यान्वित होत आहे. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम देखील सुरु झाले आहे. कणकवली एसएम हायस्कूल समोरील बाबा भालचंद्र मॉल ते टेबवाडी रस्ता बोरकर सर घराच्या अलीकडेपर्यंत हा नवीन रस्ता कणकवली शहरवासीयांच्या लवकरच सेवेत येणार आहे.

त्याकरिता नगरोत्थान अभियान अंतर्गत ३० लाख ४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बाबा भालचंद्र मॉल ते टेबवाडी रस्त्यापर्यंत 148 मीटर लांबीचा रस्ता अस्तित्वात येणार आहे. या रस्त्याची रुंदी ही 5.7 मीटर असणार आहे. टेबवाडी येथे आत मध्ये असणाऱ्या घराना रस्त्याची सुविधा उपलब्ध नव्हती. या नवीन रस्त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या हा मार्ग जवळ झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना देखील अनेक वर्षानंतर थेट आपल्या घरापर्यंत रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या रस्त्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षात साफसफाई व माती कामही हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता जमीन मालकांची समत्तीपत्र पूर्ण झाली असून, या भागातील नागरिकांनी देखील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची भेट घेत हा रस्ता करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत हे काम मार्गी लावण्यात येणार आहे. तसेच कणकवली टेबवाडी येथील प्रसाद राणे यांच्या घरा शेजारील रस्ता नूतनीकरणाच्या कामाकरिता 7 लाख 42 हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या टेबवाडी सुकी बिल्डिंग ते केतकर घरा पर्यत च्या रस्ता खडी, डांबरी करण करिता देखील 6 लाख 68 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =