You are currently viewing कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सवाचा जल्लोष

कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सवाचा जल्लोष

कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सवाचा जल्लोष

हापूस आंब्यांची आकर्षक सजावट, विविध स्टॉल्स व चविष्ट पदार्थांची मेजवानी

महोत्सवात सहभागी व्हा, आयोजकांचे आवाहन

देवगड :

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवात परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून भाविकांना विशेष आकर्षण पाहायला मिळणार आहे. यानिमित्त सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण परिसरात हापूस आंब्यांची देखणी सजावट केली जाणार आहे. याशिवाय विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन व विक्रीही आयोजित करण्यात आली असून, आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांची चव घेण्याची संधीही भाविकांना मिळणार आहे. तसेच आंब्यांच्या विविध जातींची रोपे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
महोत्सवानिमित्त रविवार, दि. १० मे ते मंगळवार, दि. १२ मे २०२६ या कालावधीत मंदिर परिसरात विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. इच्छुक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ०७ मे २०२६ पर्यंत स्टॉल बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मंदिर सजावटीसाठी स्वेच्छेने आंबा देऊन सहकार्य करावे, अशी विनंती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांनी केली आहे.
संपर्क : 7700997575 / 8788117171 / 8308372550
पत्ता : मु. पो. कुणकेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

प्रतिक्रिया व्यक्त करा