You are currently viewing परमार्थ

परमार्थ

*जीवन मुक्ती म्हणजे काय? जीवनमुक्त व्यक्ती जन्म-मरणाच्या चक्रातून सुटू शकते काय?*

🎯 *जीवन मुक्ती याचा अर्थ असा की,माणसाने प्राप्त जीवनातच मुक्ती मिळविणे हा होय.*

🎯 *माणसामध्ये बद्ध व मुक्त असे दोन प्रकार असतात.आपल्या मूळ दिव्य स्वरूपाचा विसर ज्यांना पडतो त्यांना बद्ध असे म्हणतात. याच्या उलट सद्गुरू कृपेने किंवा ईशकृपेने ज्यांना दिव्य स्वरूपाची स्मृती प्राप्त होते त्यांना मुक्त असे म्हणतात.*

🎯 *आता आपण वरील प्रश्नाच्या दुसऱ्या भागाचा विचार करू. जीवनविद्येचा असा सिद्धांत आहे की,जन्म-मरणाच्या चक्रातून कोणीही सुटू शकत नाही मग तो बद्ध असो किंवा मुक्त असो.जे बद्ध असतात ते वासनेच्या संगाने जन्म-मरणाच्या फेऱ्यात सापडून पुन्हा पुन्हां जन्माला येतात व पुन्हां पुन्हां मरतात.या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात-*

*किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजीत ।।*

🎯 *याच्या उलट जे जीवनात मुक्त होतात ते इतरांना मुक्त करण्यासाठी प्राप्त आयुष्यात प्रयत्न करतात व देहाचा त्याग केल्यानंतर तेच कार्य करण्यासाठी म्हणजे इतरांना मुक्त करण्यासाठी पुन्हा पुन्हां नवीन देहाची धारणा करतात. त्याचे प्रमुख कारण असे की जे जीवनमुक्त होतात,त्यांना मुक्तीचा आनंद इतरांनाही मिळावा अशी प्रेरणा निर्माण होते.त्या प्रेरणेच्या.पूर्तिसाठी हे जीवनमुक्त पुन्हा पुन्हां नवीन देहाची धारणा करतात.अशी प्रेरणा ज्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही,ते खऱ्या अर्थाने जीवनमुक्तच नसतात.दृष्टांत देऊन हा विषय विषद करता येईल.समजा,एका हॉलमध्ये दहा माणसांना गुंडानी दहा खांबाना बांधून टाकून ते निघून गेले.पुढे त्या दहापैकी एकाने बुद्धीचा योग्य वापर करून मोठ्या हुशारीने,प्रयत्नपूर्वक स्वतःला सोडवून घेतले.आता हा सुटलेला मुक्त माणूस “मी सुटलो ना मग इतरांचे काही का होईना”,असे म्हणून तेथून निघून जाणार नाही.. परिस्थितीत तो काय करील? तो मुक्त झालेला माणूस एकच करील, ते की.बाकीच्या नऊ लोकांना सोडवील.थोडक्यात,जीवनमुक्त असेच करीत असतात.म्हणून बद्ध असो किंवा मुक्त असो दोन्ही प्रकारची माणसे मरणाच्या चक्रातच असतात.फरक इतकाच की,बद्ध माणसे जन्म-मरणाच्या चक्रात सापडून चक्रम बनतात,तर मुक्त माणसे या चक्रात न सापडता या चक्रातील फेऱ्यांची मौज अनुभवण्याचा विक्रम करतात.*

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.*🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा