You are currently viewing कणकवलीत वागदे सरपंचाचा भाजपात प्रवेश..

कणकवलीत वागदे सरपंचाचा भाजपात प्रवेश..

शाखाप्रमुखासमवेत ग्रामपंचायत सदस्य यांचा ही भाजपात प्रवेश

 

कणकवली :

तालुक्‍यात शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के देण्याचे सत्र आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सुरू असतानाच आज शुक्रवारी पुन्हा कणकवली शहराला लागून असलेल्या वागदे गावच्या शिवसेनेच्या सरपंच पूजा घाडीगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय सराफ व शाखा प्रमुख सुहास गावडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. या प्रवेश प्रसंगी लीलाधर गावडे, तेजस्विनी गावडे, उमेश घाडीगावकर, शरद गावडे, टेबवाडी येथील गणेश गावडे, रमेश गावडे, गंगाराम घाडीगावकर, संजना गावडे, समीरा गावडे, संजय घाडीगावकर, सूर्यकांत घाडीगावकर, दिपक घाडीगावकर, मंगेश जाधव, स्वरा गावडे, वनिता गावडे, ऐश्वर्या जाधव, इंदिरा गावडे, अनिता गावडे, चंद्रभागा गावडे ,मनाली गावडे, मिलिंद घाडीगावकर, आदी असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, माजी सरपंच संदीप सावंत, संतोष गावडे, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभुगावकर, सुभाष मालडकर, शशी राणे, भाई कानेकर, महेश सरंगले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली शहराला लागून असलेल्या वागदे गावचे सरपंच व असंख्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा शिवसेनेला मोठा धक्काच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा