You are currently viewing शिरवल येथील श्री .विठ्ठल -रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण‌,अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

शिरवल येथील श्री .विठ्ठल -रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण‌,अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

१ मे ते ८ मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम ; श्री .विठ्ठल -रखुमाई मंदिराचा ७ मे रोजी सातवा वर्धापन दिन सोहळा

कणकवली

कणकवली तालुक्यातील शिरवल टेंबवाडी येथील श्री. विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम सप्ताह व ७ वा वर्धापन दिन सोहळा रविवार १ मे ८ मे या कालावधीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार १ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री. आर. जे. पवार( तहसीलदार कणकवली )आणि ह.भ.प काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग, सर्व वारकरी व शिरवल गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

१ मे ते ८ मे दररोज होणारे कार्यक्रम

सकाळी ५ ते ६:३० वाजता काकड आरती, सकाळी ६:३० ते ७:३० श्रींची महापूजा सकाळी ८ ते १२ वा .ग्रंथवाचन, दुपारी १२:३० ते २ वा.महाप्रसाद दुपारी ३ ते ५ वाजता ग्रंथवाचन सायंकाळी ६:३० ते ७:३० हरिपाठ, रात्री ८ ते १० वाजता कीर्तन‌, रात्री १० नंतर महाप्रसाद,

दिनांक ६ मे रोजी दुपारी ४:३० ते ५:३० महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,दि ७ मे रोजी सातवा वर्धापन दिन सोहळा सकाळी ५:३० ते ६:३० काकड आरती, सकाळी ६:३० ते ८:३० अभिषेक व महापूजा, सकाळी ९ ते १२ वा.ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ ग्रंथदींडी रवळनाथ मंदिर पर्यंत, सायंकाळी ६:३० ते ७:३० दिपोत्सव, रात्री ८ते १० वा.किर्तन ह.भ.प.काशीनाथ महाराज फोकमारे यांचे.

दि ८ मे रोजी ९:३० ते ११:३० काल्याचे किर्तन ह.भ.प.काशीनाथ महाराज फोकमारे यांचे होईल. मृदुंग साथ ह.भ.प. निवृत्ती मेस्त्री ओरोस, कु. गजानन राणे, चकोर सावंत, चैतन्य राणे हळवल, श्री संजय सावंत,सचिन लाड यांची मृदंग साथ लाभेल.

दि १ मे ते ८ मे रोजी किर्तन कार्यक्रम

१ मे रोजी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, शिरवल ,२ मे रोजी ह.भ.प. रमाकांत गायकवाड महाराज फोंडा हरकूळ, ३ मे रोजी ह.भ.प. श्रीकृष्ण घाटे महाराज, देवगड, ४ मे रोजी ह.भ.प. विनोद पाटील महाराज मुंबई, ५ मे रोजी ह.भ.प. विठ्ठल पाटील महाराज, बेळगाव, ६ मे रोजी ह.भ.प. आनंद जाधव महाराज ,सोलापूर, ७ मे रोजी ह.भ.प.काशिनाथ महाराज फोकमारे शेगाव, ८ मे रोजी ह.भ.प.काशिनाथ महाराज फोकमारे शेगाव,असा किर्तन कार्यक्रम होणार आहे.

व्यासपीठ व मार्गदर्शन ह.भ.प.काशिनाथ महाराज फोकमारे शेगाव यांचे असणार आहे. श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर शिरवल टेंबवाडी कणकवली येथे १ मे ते ८ मे या कालावधीत आयोजित या कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविक भक्त, वारकरी यांनी घ्यावा.असे आवाहन ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज आणि विश्वस्त मंडळ श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्ट शिरवल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा