You are currently viewing समृद्ध संविधान

समृद्ध संविधान

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सुरेखा मैड यांची अप्रतिम काव्यरचना

भारताचा पाया, आहे भीमराया
समृद्ध  आहे भारतीय संविधान
थोर डॉ. बाबासाहेबांनी निर्मिले
लोकतंत्र   आमुचे  आहे  महान //१//

अन्यायाला तुम्ही फोडली वाचा
मानती तुम्हास मानवतेचे देव
अथक,अविरत परिश्रमाने तुमच्या
मिळाली संविधानाची अमुल्य ठेव//२//

शोषित   पीडितांना   दिला   न्याय
मानवतेचे  अधिकार  गणतंत्र  पर्व
लोकतंत्र आहे माझ्या देशाचा मंत्र
सगळ्यांना आम्हा असे त्याचा गर्व //३//

भारतीय  संविधानाने चालवू राष्ट्र
नाही करणार कधी त्याची अवज्ञा
जाज्वल्य राष्ट्रप्रेम बाळगू अंतरात
सगळ्यांनी  मिळून  करू  प्रतिज्ञा //४//

प्रजा आम्ही तुमची सारी
देतो सर्व मिळूनी अभिवचन
स्मरणी ठेवून मोलाची शिकवण
माणुसकी धर्म करू सदैव जतन //५//

 

*सौ. सुरेखा मैड*
*नाशिक.*
*9527615848*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =