You are currently viewing जि. प. शाळा नंबर ६ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा

जि. प. शाळा नंबर ६ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा

माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केला शुभारंभ

सावंतवाडी

सावंतवाडीतील कै श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय जि.प. शाळा न. ६ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवीका दिपाली भालेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, उच्च शिक्षण तज्ज्ञ दिलीप भालेकर, गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ् श्री सांगेलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शाळापूर्व तयारी मेळाव्यात जून 2022 मध्ये 1 ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना व त्यांच्या मातांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते यावेळी पालकांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढून, मुलांचे औक्षण करण्यात आले.

यावेळी शा. व्य. समिती अध्यक्ष श्रीम. अनिशा राणे, उपाध्यक्षा श्रीम. प्राप्ती राणे, सौ. समीक्षा खोचरे, सौ. आसावरी ठाकूर, सौ. रेखा डंकी, सौ. पास्ते, श्री. मुद्राळे, पालक सौ. अस्मिता पाटील, सौ. अदिती करडे, सौ. सारिका लाखे, सौ. पूनम लाखे, बालवाडी बाई सौ. गावडे, शिक्षिका सौ. गीता सुतार, मुख्याध्यपिका सौ. सायली लांबर, सौ दीपा गावडे सौ. गीता चव्हाण या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्सहात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा