You are currently viewing तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील यांना तात्काळ अटक करा…..

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील यांना तात्काळ अटक करा…..

अन्यथा जनआंदोलन; मनसेचा पोलिस निरीक्षकांना निवेदनाद्वारे इशारा….

वैभववाडी :
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून एका महिला सहकारी अधिकाऱ्याचा झालेल्या विनयभंगाचा प्रकार हा अत्यंत निंदणीय आहे. तरी या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ अटक करून योग्य ती कडक कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनआंदोलन करेल असा इशारा वैभववाडी पोलिस निरीक्षकांना निवेदनाव्दारे दिला आहे.
मोबाईल व्हॉट्सअपवरून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केला आहे. हा प्रकार अत्यंत निंदणीय व अशोभनिय आहे. एका सुशिक्षित उच्चभ्रू डॉक्टराकडून ही अपेक्षा नाही. आमच्या माता-भगीनीनी व सर्वसामान्य जनता ही देवानंतर डॉक्टरांवर विश्वास ठेवते. अशा काही वाईट वृत्तीच्या डॉक्टरांमुळे महिलांना यांच्याकडे उपचार घ्यावा की नको अशी व्दिधा मनस्थिती आहे.
जर डॉक्टर आपल्या महिला सहका-यांसोबतच जर असे वागत असतील तर दुसऱ्या महिलांच्या बाबतीत या डॉक्टराकडून काय अपेक्षा ठेवावी? सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पं. स. सभेला हजर होते. त्यानंतर ते फरार आहेत. तरी या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ अटक करुन योग्य ती कडक कारवाई करावी. अन्यथा वैभववाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनआंदोलन करेल. असा इशारा वैभववाडी पोलिस निरीक्षकांना निवेदनाव्दारे दिला आहे.
यावेळी निवेदन देताना तालुकाध्यक्ष सचिन तावडे, दिपक पार्टे, महेश कदम, विनोद विटेकर, चंद्रकांत पार्टे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =