You are currently viewing सावंतवाडी येथे छावा संघटनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी येथे छावा संघटनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

येथील राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. खासकिलवाडा येथील ४ नंबर शाळेत संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर व जिल्हा सचिव कल्याणी कदम यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या शिबिराला रक्तदात्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, डॉ. कांचन विर्नोडकर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, पोलीस आनंद यशवंते, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सुरेश विर्नोडकर, डॉ. सुशांत पराडकर, डॉ. अनिल घोरे, संदीप नाईक, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव व शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा