भरतनाट्यमच्या लयबद्ध ठेक्यांवर सावंतवाडीकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी
विश्व डान्स अकॅडमीचा ९ व्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यानिमित्त उद्या भव्य भरतनाट्यम नृत्य कार्यक्रम
सावंतवाडी –
येथील विश्व डान्स अकॅडमी तर्फे शनिवार, दिनांक ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विश्व डान्स अकॅडमीचा ९ वा वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त असून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव देणारा ठरणार आहे.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारातून शास्त्रीय नृत्यपरंपरेचे सौंदर्य प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
– कार्यक्रमाचे ठिकाण: जनरल जगनाथ भोसले स्मृती शिवउद्यान, सावंतवाडी.
सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व डान्स अकॅडमीचे संचालक तुळशीदास आर्लेकर व सौ. शितल आर्लेकर यांनी केले आहे.