You are currently viewing जीव माझा तुझ्यात गुंतला

जीव माझा तुझ्यात गुंतला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे यांची अप्रतिम काव्यरचना

काॅलेज फेस्टिव्हलमध्ये मी,
पहिल्यांदा प्रेम गीत गायिले,
समोरच बसली होती तू ,
तेव्हाच माझ्या नजरेनं तुला पाहिले ||१||

काॅलेजला येता, जाता,
रोजच पाहत होतो तुला,
तुझ्यात जीव माझा गुंतला,
देशील होकार तू मला ||२||

पाऊस, ऊन, वारा लागू नये,
म्हणुन,छत्री धरायचो,
होकार तू देशील, म्हणून,
त्या नजरेने मी तुला पाहायचो ||३||

पदवी ची दोन वर्षे निघुन गेली,
तिसरं वर्षे आता सुरू झालंय,
होकार तू दिला आहेस प्रेमाचा,
सकाळी स्वप्नात मी पाहिलंय ||४||

क्षणोक्षणी तुझी आठवण येते,
तेव्हा,हाती घेतो मी, कुंचला,
चित्र तुझे काढण्या कागदावरी,
जीव माझा तुझ्यात गुंतला || ५||

युवा कवी प्रविण खोलंबे.
मो. ८३२९१६४९६१.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 14 =