सावंतवाडी मनसे शहर कार्यकारिणी जाहीर…
परशुराम उपरकर यांच्या हस्ते नवनियुक्तांचे स्वागत.

सावंतवाडी मनसे शहर कार्यकारिणी जाहीर…

आज सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी या नेमणुका जाहीर केल्या.
यात मनसे महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी ललिता नाईक मनसे तालुका अध्यक्षपदी ओंकार कुरतडकर, मनसे शहर सचिवपदी आकाश परब, सहसचिवपदी बंटी गावडे, उपशहर अध्यक्ष पदी शुभम सावंत तसेच देवेंद्र कदम सावंतवाडी, सोशल मीडिया अध्यक्षपदी भास्कर सावंत आदींच्या नेमणुका करण्यात आल्या.
मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर मनसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, दया मेस्त्री, देवेश परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा