You are currently viewing ॲड. मेघ:श्याम उर्फ विक्रम श्रीपाद भांगले…

ॲड. मेघ:श्याम उर्फ विक्रम श्रीपाद भांगले…

वाढदिवस अभिष्टचिंतन..

सावंतवाडी शहराला अभिमानास्पद कामगिरी करणारा मेघ:श्याम उर्फ विक्रम भांगले म्हणजे सुंदरवाडीचा हिरा. कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमबाजीमध्ये दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या विक्रमची सावंतवाडीकरांना माहिती तशी कमीच. आपल्या शहरातील एक तरुण फक्त देशातील नेमबाज म्हणून यशस्वी न होता देशाच्या नेमबाजी संघाचा प्रशिक्षक बनला. आज भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवर कित्येक नेमबाज चमकत आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचे मोलाचे काम आपल्याच शहरातील आपल्याच एका मित्राने केलंय ही केवढी अभिमानास्पद गोष्ट…!
मेघ:श्याम भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांसाठीही आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणूनही मेघ:श्याम भांगले काम पाहतात. ते गोवा संघाकडून खेळले आहेत, तसेच गोवा येथे प्रशिक्षणही दिले आहे. सावंतवाडीच्या उपरकर शूटिंग रेंजचे कित्येक खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत मेडल्स मिळवतात, त्यांना कांचन उपरकर यांच्यासोबत मेघ:श्याम भांगले यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळते. जिल्ह्यातील खेळाडूंना देशांतर्गत पातळीवर कोणतीही अडचण आल्यास मेघ:श्याम नेहमीच सहकार्य करतात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रायफल असोसिएशनला त्यांचा आधार वाटतो. सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणूनही ते काम करत आहेत.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडू आणि देशाचे नेमबाजी प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय ज्युरी मान.मेघ:श्याम उर्फ विक्रम भांगले यांना संवाद मिडियाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =