जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक-कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना
शेजारधर्म
संजय धनगव्हाळ
किती माणस येतात
किती माणस भेटतात
जातपात विसरून जे
दुसऱ्यालाही आपलस
करून घेतात
अशीच माणस
देवासारखी असतात
आपले सख्खे अतंर देतील
शेजारपाजार सोयरे होतील
कोणी कसेही असले तरी
भेदभाव विसरून जे
जीवाला जीव देतात
अशीच माणस
देवासारखी असतात
प्रेमाने समजून सागंतात
मायबाप होवून वागतात
स्वार्थ बाजूला ठेवून जे
न सांगता पाठराखण
करतात
अशीच माणस
देवासारखी असतात
परके कधी समजत नाही
तिरस्काराने कधी पहात नाही
आनंदातही सहभागी करून जे
गुण्यागोविंदाने राहतात
अशीच माणस
देवासारखी असतात
सुख दुःख वाटून घेतील
मदतीला धावून येतील
नात्यागोत्यात बांधून जे
नाते जिव्हाळ्याचे
जुळवून घेतात
अशीच माणसे
देवासारखी असतात
कितीही असले गणगोत
तरी आयत्यावेळी कोणी
जवळ रहात नाही
असले तरी कोणी
लवकर येत नाही
माणूसकीचा आधार देवून जे
हाकेला होकार देतात
अशीच माणस
देवासारखी असतात
या जगात कोणी
कुणाच नसल तरी
शेजारधर्म सोडतं नाही
आपुलकीच्या नात्याला
जातीचा रंग लावत नाही
पोटतिडकीने काळजी घेवून
जे अडचणीत साथ देतात
आशीच माणस
देवासारखी असतात
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८