संविधान प्रेमी नागरिकांची निषेध सभा

सावंतवाडी

हाथरस,उत्तर प्रदेश येथील मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनी सायंकाळी ५ वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे सर्व संविधानप्रेमी सजग नागरिकांची निषेध सभा आयोजित केली आहे.
हाथरस सारख्या घटना ,अत्याचार आपल्या माता भगिनींवर भविष्यात घडू नयेत असे वाटत असेल तर आपण या निषेध सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान बचाव समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =