You are currently viewing चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन संपन्न

चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन संपन्न

पिंपरी

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात गुरुवार, दिनांक २३ मार्च २०२३ रोजी विविध धार्मिक विधींच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ प्रकटदिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, नाना काटे, मोरेश्वर शेडगे, शैलेश मोरे, राजाभाऊ गोलांडे, मधू जोशी; तसेच श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, कोषाध्यक्ष गणपती फुलारी, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पहाटे ठीक ४:३० वाजता श्रींचा अभिषेक आणि पूजा संपन्न झाली. सकाळी ६:०० वाजता सुमारे सहाशे भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा लक्षावधी गायत्रीजप करण्यात आला. त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. सकाळी ८:०० वाजता सुमारे दोनशे भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक रुद्र अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर स्वामी स्वाहाकार यज्ञास प्रारंभ झाला.‌ दुपारी १२:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आरती आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला. आरतीनंतर दुपारी ३:०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सुमारे बारा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ५:३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे, विजय कुलकर्णी आदी सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. महेश राजोपाध्ये यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले.

– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 12 =