You are currently viewing मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत अजिंक्य रेडेकर प्रथम

मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत अजिंक्य रेडेकर प्रथम

इचलकरंजी / प्रतिनिधी

पुणे , बालेवाडी येथे इंडियन बाॅडीबिल्डिंग ॲन्ड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या
मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत वस्ञनगरीचा अजिंक्य रेडेकर याने ८५ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.त्यामुळे तो सिनियर भारत श्री २०२२ चा मानकरी ठरला.त्याच्या या घवघवीत यशाने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

वस्ञनगरीचा सुपूञ अजिंक्य रेडेकर याने अनेक खडतर परिस्थितीवर मात करत बाॅडीबिल्डिंग स्पर्धेतील आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे.
व्यायामाचा नियमित सराव ,ज्येष्ठांचे मार्गदर्शन व जिंकण्याची जिद्द या ञिसूञीच्या आधारे त्याने आजपर्यंत अगदी इचलकरंजी शहर पातळीपासून ते तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवरच्या अनेक बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत चांगले यश संपादन करत तीन वेळा ज्युनिअर मिस्टर इंडिया ,चार वेळा महाराष्ट्र श्री आणि सिनिअर मिस्टर इंडिया किताब मिळवला आहे.याशिवाय राज्य शासनाचा
शिवछञपती पुरस्कार मिळवून बाॅडीबिल्डिंग स्पर्धेतील आपल्या यशाचे कर्तृत्व सिद्ध केले आहे.नुकताच पुणे बालेवाडी येथे इंडियन बाॅडीबिल्डिंग ॲन्ड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या
मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत वस्ञनगरीचा अजिंक्य रेडेकर याने ८५ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.त्यामुळे तो सिनियर भारत श्री २०२२ चा मानकरी ठरला आहे .त्याच्या या घवघवीत यशाने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.याबद्दल त्याचे विविध स्तरातून मोठे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + five =