You are currently viewing माजगाव माटव हॉटेल समोर कंटेनर पलटी; वाहतूक ठप्प

माजगाव माटव हॉटेल समोर कंटेनर पलटी; वाहतूक ठप्प

सावंतवाडी

माजगाव माटव हॉटेल समोर जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कॅन्टर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना आज दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीविहानी झाली नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रंग लागल्या आहेत. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.या अपघातामुळे एस टी बसेस अडकून पडल्या आहेत.

इन्सुली हून सावंतवाडीच्या दिशेने येणारा कंटेनर माजगाव माटव हॉटेल समोर वळणावर मालकाचा गाडीवरील ताबा सुटून पलटी झाला. यात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही मात्र रस्त्याच्या दुतर्फा एसटी बसेस अडकून पडल्या आहेत. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस दाखल झाले आहेत. रस्त्यावरील कंटेनर बाजूला करण्यासाठी ट्रेन मागविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nine =