You are currently viewing बांदा सोसायटी निवडणूक बिनविरोध

बांदा सोसायटी निवडणूक बिनविरोध

बांदा

बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले.
संस्थेवर आदम आगा, घनश्याम बांदेकर, संजय चांदेकर, आप्पाजी देसाई, भिकाजी धुरी, सुभाष परब, राजाराम सावंत, लक्ष्मण सावळ, अर्चना आंबेलकर, कामिनी कुडव, देऊ मळगावकर, जानू बुटे, लक्ष्मण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी प्रमोद कामत व संजू परब यांनी नूतन संचालकांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदवळे, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, संदीप बांदेकर, निलेश देसाई, रत्नाकर आगलावे, भाई म्हाडगूत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कामत व संजू परब यांनी बांदा सोसायटीला सर्वतोपारी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आभार बाळू सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा