You are currently viewing अकरा निवृत्त विज कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेणार – तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

अकरा निवृत्त विज कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेणार – तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

सावंतवाडी / प्रतिनिधी :

विज महावितरण कंपनीतील निवुत विज कामगार यांची ग्रॅजुईटी रोजंदारी काळातील (उपदान) कमी दिल्याप्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी या वीज कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून हा प्रश्न राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मार्फत सोडवण्याचे आश्वासन या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगेलकर यांनी दिले.

अशाप्रकारे अकरा कंत्राटी कामगारांना रोजंदारी काळातील उपदान कमी दिले असून या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. यामध्ये श्री. सुधाकर सि. गावडे, श्री. महादेव न्हा. राउळ ,श्री. गणपत म. म्हापणकर , श्री. मेघशाम भोज तावडे , श्री. सुनिल भ. पालकर , श्री. महादेव रा. मांजरेकर , श्री. सुभाष भू. केरकर ,श्री. मारुती स. पेडणेकर , श्री. अजित रा. पिंगुळकर ,श्री. महादेव रा. शिरोडकर ,श्री. सखाराम गो. जाधव या निवृत्त वीज कामगारांना 2016 ते 2020 पर्यंत सुमारे 40 वर्षे सेवा होऊनही आणि त्यांनी विच वीज लाईनवर काम करूनही सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारी घ्यायची ग्रॅच्युईटी कमी वर्षाची देण्यात आले. ही बाब या कामगाराने माहितीच्या अधिकाराखाली अधिकाराखाली माहिती मागवल्या नंतर उघड झाली असून सेवा पुस्तकात नोंद न केल्यामुळे या कामगारांचे वीज महावितरण कंपनी मे नुकसान केले आहे.  तसेच याबाबत त्यांनी पत्रव्यवहार केला असता सेवा पुस्तकात नोंद नसल्याचे बेजबाबदार उत्तर वीज महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी आणि माहिती अधिकारी यांनी दिले आहे. दरम्यान हे अकरा ही कंत्राटी वीज कामगार अल्पशिक्षित असून आपली फसवणूक झाली असून आम्हाला योग्य न्याय देण्याची मागणी या कामगाराने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे केले आहे. तरी उर्वरित ग्रॅच्युईटी ची रक्कम देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या निवृत्त वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा