You are currently viewing संविधान बचाव, देश बचाव,भाजपाको देश से भगाव

संविधान बचाव, देश बचाव,भाजपाको देश से भगाव

सिंधुदुर्गात जनजागृती अभियान; रतनभाऊ कदम

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संविधान बचाव, देश बचाव, भाजपा को देश से भगाव जनजागृती ची सुरुवात करण्यात आली आहे.
संपूर्ण देशभरात अशा प्रकारे (संविधान बचाव, देश बचाव और भाजपा RSS को इस देश के भगाव)
कार्यक्रम घेण्यात येणार असून भारत देशातून भाजपा आणि RSS सारख्या जातीयवादी पक्षांना या देशात थारा देणार नाही असे आवाहन आंबेडकर चळवळीचे पॅंथर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश नेते रतनभाऊ कदम यांनी केले आहे.

संविधानाचा आदर झाला पाहिजे ते सर्वसामान्य जनतेला समजले पाहिजे. जातीयवादी पक्षाकडून संविधानाला धोका निर्माण झाला आहे. ते वाचविण्याच्या दृष्टीने सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जयंती मंडळांना भारतीय संविधानाची प्रत देण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरू आहे. यापुढेही तो अविरत सुरू राहील. संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या जातीयवादी (भाजप) पक्षाला या देशात थारा देणार नाही असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश नेते रतनभाऊ कदम यांनी केले आहे. तर याची जनजागृती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =