You are currently viewing मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू

पिंगुळी गुढीपुर येथे घडली घटना; कारचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

कुडाळ
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी गुढीपुर येथे कारच्या धडकेने पादचारी श्रीधर विष्णू कडूलकर ( ६०, रा. पिगुळी – धुरी टेबनगर ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. कारचालक शमशुद्दिन बाबू ढोले ( रां .कसबा – राधानगरी ) आपल्या ताब्यातील कार घेऊन बांदा येथून कोल्हापूरला जात होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाले . कारचालकाला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − nine =