You are currently viewing साळेल येथे २८ रोजी रक्तदान शिबीर

साळेल येथे २८ रोजी रक्तदान शिबीर

मालवण

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि आचरेकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार सिद्धू आचरेकर यांची सुकन्या ज्ञानदा हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी साळेल येथील पवार बंगला येथे सकाळी ९ ते दुपारी १ वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी इच्छूक रक्तदात्यांनी सिद्धू आचरेकर 8275649254, दत्ता पिंगुळकर, आरोग्य सेवक- 9403640431, कमलाकर गावडे 9423553267, भुषण गावडे 8408849565 यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा