यंगस्टार चषक प्रिमिअर लिग कबड्डीचा समीर नलावडे यांच्याहस्ते शुभारंभ
कणकवली
कबड्डी हा लालमातीतील खेळ असून या खेळाचे वैभव टिकवून ठेवण्याचे काम यंगस्टार मित्रमंडळातर्फे केले जात आहे . ही कौतुकास्पद बाब असून कबड्डीपटूंना हा खेळखेळता यावा म्हणून येथील भालचंद्र महाराज संस्थेच्यालगत नगरपंचायतीने उभारलेल्या क्रीडासंकुलातील कबड्डीचे मैदान कायमस्वरूपी उपलब्ध करून देणार आहे अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली . यंगस्टार मित्रमंडळातर्फे विद्यामंदिर हायस्कूल पटांगणावर यंगस्टार चषक २०२२ भव्य प्रिमिअर लिग कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी समीर नलावडे बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे , पं.स.चे उपसभापती मिलिंद मेस्त्री , रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे नगरसेविका मेघा गांगण , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे , उपाध्यक्ष रमेश जोगळे , भरत उबाळे , यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे , सामाजिक कार्यकर्ते अनिल हळदिवे , भैय्या आळवे , किरण गावकर , नंदू वाळके , व्यंकटेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते . समीर नलावडे म्हणाले यंगस्टार मित्रमंडळाचे सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डी खेळाला सुवर्ण दिवस दाखवण्याचे काम यंगस्टारने केले आहे .
यंगस्टारने यापुढील काळात शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात काम करावे . यंगस्टारच्या कोणत्याही उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील , अशी ग्वाही दिली. अनिल हळदिवे म्हणाले , या यंगस्टारचा प्रत्येक कार्यकर्ता यंग असल्याचे सामाजिक , सांस्कृतिक , कीडा क्षेत्रात नावलौलिक मिळवला आहे . कार्यकर्त्यांच्या एकजूटीमुळे हे मंडळ नावलौलिकास पात्र ठरले आहे . अण्णा कोदे यांनी प्रास्ताविक अण्णा कोदे यांनी केले सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले . तीन दिवस चालणारी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी यंगस्टारचे कार्यकर्ते मेहनत घेत आहे .