You are currently viewing वैभववाडीत ५ ऑक्टोंबर रोजी ई-श्रम कार्ड योजनेबाबत मार्गदर्शन..

वैभववाडीत ५ ऑक्टोंबर रोजी ई-श्रम कार्ड योजनेबाबत मार्गदर्शन..

वैभववाडी

केंद्र सरकारच्या ई श्रम कार्ड योजनेचं श्री माधवराव भंडारी. यांच्या उपस्थितीत वैभववाडीत मंगळवारी 5 आॅक्टोबरला मार्गदर्शन केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना ई श्रम कार्ड योजनेचं आयोजन प्रवण फार्मर कंपनी यांनी वैभववाडीत ५ अॉक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर अर्बन बँक वैभववाडी येथील सभागृहात आयोजित केला आहे या कार्यक्रमाला ई श्रम योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने आणली आहे ई श्रम पोर्टल मध्ये आपली नाव नोंदणी करुन केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे पोर्टल मध्ये नाव नोंदणी केलेल्या कामगारांना मोफत २ लाखांचा अपघाती विमा मिळणार आहे वय वर्षे १६ ते ५९ वयोगटातील सर्व असंघटित कामगार आपली नाव नोंदणी करु शकतात . पोर्टल मध्ये शेतमजूर, रिक्षा चालक, सलुन कामगार, बांधकाम कामगार, घरेलु कामगार, अंगणवाडी सेविका,आशा सेविका, इत्यादी क्षेत्रातील कामगार नाव नोंदणी करु शकतात प्रवण फार्मर कंपनी आयोजित केलेल्या ई श्रम योजना कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वैभववाडी तालुका सभापती सौ.अक्षता डाफळे , जि.प.सदस्य श्री. सुधीर नकाशे कंपनी चे अध्यक्ष श्री महेश संसारे संचालक श्री प्रमोद रावराणे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम मंगळवार दिनांक ५ अॉक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर अर्बन बँक वैभववाडी येथील सभागृहात आयोजित केला आहे या कार्यक्रमात वैभववाडी तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन श्री राजु पवार यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 9 =