You are currently viewing टीचर टॉक फोरमची दोडामार्ग तालुका कार्यकारणी जाहीर

टीचर टॉक फोरमची दोडामार्ग तालुका कार्यकारणी जाहीर

टीचर टॉक फोरमची दोडामार्ग तालुका कार्यकारणी जाहीर

सावंतवाडी

मुंबई येथील एस.आर.दळवी फाउंडेशन टीचर टॉक फोरमची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी उदय विठ्ठल गवस यांची तर सचिवपदी श्रीम. तेजा विठू ताटे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष कार्यक्रम पदावर अनिल गोविंद ठाकर तर उपाध्यक्ष सदस्य विकास या पदावर कृष्णा शांताराम नाईक यांची निवड झाली आहे आहे. सहसचिव पदासाठी तुषार भगवान पवार यांना नियुक्ती देण्यात आली आहे. एस आर दळवी फाऊंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश लाडू सावंत यांनी सदर कार्यकारणीची निवड जाहीर केली आहे.

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र धर्माजी दळवी आणि त्यांच्या पत्नी श्रीम. सीता रामचंद्र दळवी यांनी मुंबईत सदर राज्यस्तरीय फाऊंडेशनची स्थापना शिक्षक सक्षमीकरणासाठी केली आहे. विविध वेबिनारच्या माध्यमातून शिक्षकांना समृद्ध केले जाणार आहे. तसेच शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन होणार आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे सर्व स्तरातील शिक्षक फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. फाउंडेशनने टीचर टॉक नावाचे ॲप निर्माण केले असून याच व्यासपीठाच्या माध्यमातून शिक्षकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याद्वारे विचारांची देवाणघेवाण होणार आहे. याच ॲपच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. तसेच विविध शैक्षणिक बातम्या आपणास ज्ञात होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि इतर सर्वच प्रकारच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तीनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश लाडू सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =