You are currently viewing सिंधुदुर्ग गोवा बॉर्डर वरील जुगाराचे अड्डे सुरू करण्याच्या हालचाली पेडणे पोलिसांनी रोखल्या

सिंधुदुर्ग गोवा बॉर्डर वरील जुगाराचे अड्डे सुरू करण्याच्या हालचाली पेडणे पोलिसांनी रोखल्या

*बॉर्डर वरील जुगाराच्या मैफिलींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळींची गर्दी*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गैर धंद्यांना खाकी वर्दीच्या आशीर्वादाने ऊत आलेला आहे. एका रात्रीत होत्याचे नव्हते करणारा जुगार सारखे गैरधंदे आज गावागावात, शहराशहरात खेळले जात असलेले दिसत आहेत. त्या त्या ठिकाणच्या बीट अंमलदार यांना हाताशी धरून जुगारी मोठमोठ्या बैठका भरवत आहेत. सिंधुदुर्ग गोवा बॉर्डरवर जुगाराच्या मैफिली सुरू करण्याच्या हालचाली जोरदार सुरू होत्या. परंतु गोवा पेडणे येथील पोलीस निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे बॉर्डर वर जुगाराचे अड्डे सुरू करण्याच्या हालचाली रोखल्या गेल्या. बॉर्डर वर जुगाराच्या मैफिली भरविण्याची तयारी पूर्ण झाली होती.

सिंधुदुर्ग गोवा बॉर्डर वरील या जुगाराचा अद्द्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगारी लोकांचा जास्त भरणा असतो. गोव्यातील जुगारी मोठ्या प्रमाणात पैसे लावून खेळ खेळला जातो त्यामुळे त्यातून अधिक लाभ घेण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू गोवा बॉर्डर वरील या जुगाराच्या मैफिलींमध्ये खेळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा येथे नोकरीनिमित्त ये-जा करणारे काही जुगारी येताना या मैफिलीचा आस्वाद घेऊन घरी येतात. त्यामुळे नोकरीनिमित्त जाणारे काही लोक जुगार मध्ये नशीब आजमावत असल्याचे समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही लोकांकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्यात आल्याने आता सिंधुदुर्ग गोवा बॉर्डरवरील जुगाराच्या अड्ड्यावर टाच झाली आहे.

सिंधुदुर्ग गोवा बॉर्डरवरील या जुगाराच्यां अड्डामुळे सावंतवाडी, दोडामार्ग,वेंगुर्ला बॉर्डर जवळ असणाऱ्या तालुक्यातील तरुणाई बिघडत असल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर हे गैर धंदे यांच्या विरोधात नेहमीच आक्रमक पणे आवाज उठवत असतात. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषता सावंतवाडी सह गावांमध्ये सुरू असणारे जुगाराचे अड्डे आणि दारूसारख्या गैरधंद्यांवर मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे, अशी आशा मतदारसंघातील नागरिकांना वाटत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी दारू जुगार सारख्या गैर धंदे यांच्या मागे न लागता उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी आमदार केसरकर यांच्याकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी दारू जुगार सारख्या धंद्यांवर जिल्हा पोलिसांकडून टाच आणावीच लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा