You are currently viewing पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा  ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी नाव नोंदणी करावी…

पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा  ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी नाव नोंदणी करावी…

सिंधुदुर्गनगरी : 

इयत्ता बारावी पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तद्अनुषांगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी 8 ऑक्टोबर 2020 पर्यंत मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे  यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी इ. 12 वी पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तद्अनुषंगीक बाबींसंदर्भात सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असून प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांची evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रामध्ये आपली माहिती दि. 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. नाव नोंदणीस दिलेल्या मुदतीनंतर लिंक बंद केली जाणार असल्याने शिक्षकांनी विहित मुदतीत आपल्या नावाची नोंदणी करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 6 =