You are currently viewing भीमवंदना

भीमवंदना

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ अनिता व्यवहारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेली भीमवंदना

*घटनेचे शब्द होऊन दलितांना चेतवले अन दिली मुक्ती*
*तूच तर खरी आहे दलितांची शक्ती.*.

*आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना शतशः प्रणाम*🙏🙏
*आपला भारत देश म्हणजे जणू नवरत्नांची खाण याच खाणीतून जन्मला एक तेजस्वी हिरा ज्याची चकाकी आजही समाजात झळाळून टाकते आहे कारण त्यांनी जन्माला आल्यापासून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी क्रांती घडवून आणली. *जे कार्य त्यांनी केले ते अतिशय प्रेमाने निष्ठेने, सद्भावना,सुविचार यांना मनात जागृत ठेवून*..
*14 एप्रिल 1891 रोजी रामजी व भिमाबाई यांच्या पोटी मध्यप्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यांना जन्म देणारी माता पिता हे तितकेच महान.* *वंचित समाजाचे तारणहार असलेल्या बाबांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन खूप प्रगल्भ तर होताच पण त्याला आधुनिकतेची जोड होती. स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेताना आलेल्या अडचणी इतर देशातल्या शिक्षणाचा प्रसार पाहून *शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही* याची जाणीव त्यांना झाली जणू त्यांनी तोच आदर्श समाजापुढे घालून दिला *अनेक शिक्षण संस्था काढल्या. ज्ञानाअभावी व्यक्ती व समाज यांचे नुकसान होते हे ध्यानात घेऊन मागासवर्गीयांना ही शिक्षण मिळणे तितकेच गरजेचे आहे हे त्यांनी लक्षात घेतले* त्यासाठी त्यांनी **शिक्षणाची द्वारे खुली केली एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्वच मारून टाकले असे त्यांना वाटत. त्यांनी उच्च शिक्षणा द्वारे समता स्वातंत्र्य बंधुता ही मूल्ये आत्मसात करणारा समाज निर्माण केला*.

*विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेला एक संदेश आजही तितकाच मार्गदर्शक ठरतो*
*शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे आणि त्यावरून चालायचे असेल तर चिंतन मननातून केलेला अभ्यास हा महत्त्वाचा आहे असे ते म्हणत त्यांच्या या शिक्षणाच्या अभ्यासातूनच दलित समाजाचा ऱ्हास होता होता थांबला. दलितांचे कैवारी असलेल्या *बाबासाहेबांना दलितांच्या भविष्याची काळजी ठेवून उशाशी*
*कित्येक वेळा झोपावे लागले होते उपाशी*
*माणसाने माणसाशी वागताना मनुष्य जन्म नश्वर आहे तसे विचारही नश्वर आहेत हे लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणत* *एखाद्या झाडाला जसे पाणी दिली नाही तर ते मरते तसे विचारांना विवेकाचे, प्रचार प्रसाराचे माध्यम उपलब्ध झाले नाही तर ते नष्ट होतात असे ही ते सांगत*.
*सामाजिक राजकीय वैचारिक क्षेत्रात निपुण कामगिरी करणारे डॉ. बाबासाहेब आरोग्याचा मूलमंत्र देण्यास ही विसरलेले नाहीत. ते म्हणतात*

*व्यायामाने शरीर सुदृढ बनत वाचनाने मस्तक सुधारतं तर मन खंबीर बनत..*
*सुदृढ होते व त्यांचा त्यावर गाढ विश्वास होता*
तसेच *स्त्रियांची उद्धारक म्हणूनही त्यांनी कार्य केले. आपल्या हक्कासाठी मनो दौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे. *भारतीय स्त्रीला कायदेशीर रित्या सर्वांगाने सक्षम बनविण्याचे कार्यातही त्यांनी सहभाग घेतला समाजातील स्त्रीची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होईल हे त्यांचे विचार स्त्रियांबद्दल आदर स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत.*
*ज्याने कधी सूर्योदय पाहिला नाही त्याला अंधाराची भीती वाटत नाही अंधारात राहील्या ची खंत त्याला जाणवत नाही भारतीय स्त्रीच्या नशिबी असच अंधाराचे जाळे पसरलेले असताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रीला घराबाहेर काढून शिक्षण दिले तसेच ते स्वावलंबी बनावे म्हणून प्रयत्न केले आणि त्यापुढची पायरी म्हणजे *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीला कायदेशीर हक्क मिळवून दिले. भारतीय संविधानात प्रत्येक स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याचे कार्यही बाबासाहेब आंबेडकर.. यांनीच केलं… स्त्रीचं अस्तित्व नाकारणारे असेच अनेक कायदे त्यांनी मोडीत काढले… बालविवाह, विधवाविवाह केशवपन अशा अनेक गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी सुकर करून *स्त्री मुक्तीसाठी* लढा दिला…
इतके अगाध कार्य करणाऱ्या यामाहा मानवी व विषयी बोलणे म्हणजे *सिंधूत बिंदू*
लेखणी तरा पुरी पडेलच परंतु कागदही अपुरे पडतील आणि माझ्या विचारशक्तीच्या पलीकडेही असलेलं त्यांचं कार्य मला शब्दात सांगता येणार नाही म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा अभिवादन🙏 करून माझ्या वाणीला विराम देते.
आणि त्यांच्या विषयी फक्त एवढेच म्हणेन

*असा कोण हा मानव थोर*
*ज्याने तोडला जातीपातीचा दोर*
एकच नाव..*.डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*🙏

सौ अनिता व्यवहारे
*श्रीरामपूर*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 5 =