You are currently viewing वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेचे छप्पर पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा

वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेचे छप्पर पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा

शाळा व्यवस्थापन समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

वेंगुर्ला

वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे छप्पर पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून मुलांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण राजापूरकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे

वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेच्या इमारतीचे छप्पर मोडकळीस येऊन धोकादायक बनलेले आहे. कोणत्याही क्षणी या इमारतीचे छप्पर पडून धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने छपराची कवले उतरून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, या इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी न केल्यास मुलांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे ही बाब लक्षात घेऊन या शाळा इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम तात्काळ करून येथे होणारी मुलांची गैरसोय व संभाव्य धोका टाळावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 7 =